Ad will apear here
Next
प्रसाद शिरगांवकरांची तीन पुस्तके वाचकांच्या भेटीला; २५ फेब्रुवारीपर्यंत प्रकाशनपूर्व सवलत


पुणे :
सोशल मीडियावरील लोकप्रिय लेखक प्रसाद शिरगांवकर यांची तीन पुस्तके २९ फेब्रुवारी २०२० रोजी वाचकांच्या भेटीला येत आहेत. ‘i-बाप,’ ‘भटक्याची डायरी’ आणि ‘सुखांचे सॅशे’ अशी त्या पुस्तकांची नावे असून, पुण्यातील ‘बुकगंगा पब्लिकेशन्स’तर्फे ही पुस्तके प्रकाशित होत आहेत. प्रकाशनपूर्व नोंदणी केल्यास या पुस्तकांचा संच तब्बल ३० टक्के सवलतीत उपलब्ध होणार असून, ही सवलत २५ फेब्रुवारी २०२०पर्यंत नोंदणी केल्यास आहे.

सोशल मीडियावर विविध विषयांवर रोचक शब्दांत लेखन करणारे लेखक म्हणून प्रसाद शिरगांवकर प्रसिद्ध आहेत. त्यांचे विविध विषयांवरील लेखन आता ‘i-बाप,’ ‘भटक्याची डायरी’ आणि ‘सुखांचे सॅशे’ या तीन पुस्तकांच्या रूपाने प्रसिद्ध होत आहे. त्यापैकी ‘i-बाप’ या पुस्तकाची ही दुसरी आवृत्ती आहे. तीन पुस्तकांची एकत्रित किंमत ५९७ रुपये असून, पूर्वनोंदणी केल्यास ही पुस्तके ३० टक्के सवलतीत म्हणजे केवळ ४२० रुपयांत उपलब्ध होणार आहेत. ‘भटक्याची डायरी’ आणि ‘सुखांचे सॅशे’ या दोन पुस्तकांचा संच ३९८ रुपये असून, पूर्वनोंदणी केल्यास त्यावरही ३० टक्के सवलत असून, तो केवळ २८० रुपयांत उपलब्ध होणार आहे. ही पुस्तके स्वतंत्रपणे खरेदी केल्यास प्रत्येक पुस्तकाची किंमत १९९ रुपये असून, स्वतंत्रपणे पूर्वनोंदणी केल्यास ती प्रत्येकी २५ टक्के सवलतीत म्हणजेच प्रत्येकी १५० रुपयांत उपलब्ध होणार आहेत. ही पुस्तके ई-बुक स्वरूपातही प्रसिद्ध होणार आहेत. (बातमीच्या शेवटी नोंदणीसाठी लिंक दिली आहे.)

पुस्तकांविषयी : 
भटक्याची डायरी : १०-१२ देशांमधल्या २५-३० शहरांमध्ये हिंडलेल्या एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय पुणेकराची ही डायरी आहे. कामानिमित्त जगभर हिंडत असताना घडलेले प्रसंग, आलेले अनुभव आणि ते अनुभवत असताना किंवा नंतर मनाता आलेले विचार ह्या डायरीमध्ये आहेत. ही डायरी तारीख, वारानुसार मांडलेली नाही. २० वर्षांच्या भटकंतीच्या काळातल्या डायरीची शे-दोनशे पानं एकत्र करून समोर ठेवली आहेत. हे टूर गाइड किंवा प्रवासवर्णन नाही, तर एका ग्लोबल भटक्याचं ‘प्रवासचिंतन’ आहे.

सुखांचे सॅशे : आपण आपल्या आयुष्यात सुखांच्या मोठ्या मोठ्या पॅकेट्सच्या मागे अहोरात्र धावत असतो. मोठ्ठं घर, मोठ्ठी गाडी, भरपूर बँक बॅलन्स, अफाट प्रसिद्धी, प्रचंड यश, वगैरै वगैरे. सुखांचे हे भले मोठ्ठे पॅक्स मिळावेत म्हणून आपण जीवापाड मेहनत करत राहतो. हे पॅक मिळाले, तरच आनंदी होतो. नाही मिळाले तर किंवा मिळत नाहीत तोवर दुःखी राहतो. पण सुखं ही फक्त मोठ्या पॅक्समध्ये मिळत नाहीत, तर छोट्याशा सॅशेमध्येही मिळू शकतात, हे आपण लक्षातच घेत नाही. अशा छोट्या छोट्या सॅशेजमधून मिळणाऱ्या छोट्या-मोठ्या आनंदाविषयीचा ललित लेखसंग्रह म्हणजे ‘सुखांचे सॅशे’ हे पुस्तक.

i-बाप : iPad, iPhone, internet युगातल्या एका बापाचे संवेदनशील स्टेटस अपडेट्स ‘i-बाप’ या पुस्तकात आहेत. त्यात काही स्वैर विचार आहेत, काही अनुभव आहेत आणि लेखकाने अनुभवलेले आणि कदाचित आजच्या जगातला कोणीही डोळस बाप अनुभवत असेल असे काही प्रश्नही आहेत.

जास्तीत जास्त वाचकांनी प्रकाशनपूर्व नोंदणी करून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन लेखक प्रसाद शिरगांवकर आणि ‘बुकगंगा पब्लिकेशन्स’ यांच्यातर्फे करण्यात आले आहे. 

(प्रकाशनपूर्व नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)









 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZSPCJ
Similar Posts
प्रसाद शिरगांवकरांच्या तीन पुस्तकांचे २९ फेब्रुवारीला पुण्यात प्रकाशन पुणे : सोशल मीडियावरील लोकप्रिय लेखक प्रसाद शिरगांवकर यांनी लिहिलेली, आगळावेगळा वाचनानुभव देणारी तीन पुस्तके २९ फेब्रुवारी २०२० रोजी पुण्यात प्रकाशित होणार आहेत. ‘i-बाप,’ ‘भटक्याची डायरी’ आणि ‘सुखांचे सॅशे’ अशी त्या पुस्तकांची नावे आहेत. ‘बुकगंगा पब्लिकेशन्स’तर्फे ही पुस्तके प्रकाशित होत असून, प्रसिद्ध लेखक, आयटी तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ डॉ
प्रसाद शिरगांवकरांचे लेखन सखोल आणि विचार करायला लावणारे पुणे : ‘कोणतेही लेखन माणसाला विचार करायला प्रवृत्त करत असेल तर ते कालातीत होते. तसेच लेखन वाचकांना आवडते. प्रसाद शिरगांवकर यांनी लिहिलेल्या तिन्ही पुस्तकांमधील लेखन हे विचार करायला प्रवृत्त करणारे आहे. प्रसाद फेसबुकवर लिहितो, तरीही हे लेखन खूपच सखोल आहे हे पाहून खूप छान वाटले,’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ आयटीतज्ज्ञ व अर्थतज्ज्ञ डॉ
‘असंच होतं ना तुलाही’च्या दुसऱ्या आवृत्तीचे २३ जानेवारीला पुण्यात प्रकाशन पुणे : सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात पुस्तके वाचण्याचे प्रमाण कमी झाले आहे, त्याचा परिणाम पुस्तकांच्या विक्रीवरही झालाय. त्यातही कवितासंग्रह विकत घेऊन वाचण्याचे प्रमाण तर अगदीच कमी आहे... अशी आणि अशा आशयाची वाक्ये आपल्याला ऐकायला मिळतात. काही प्रमाणात ती खरीही आहेत. मिलिंद जोशी यांच्या ‘असंच होतं ना
से चीज : दंत, मौखिक आरोग्याविषयीच्या डॉ. भक्ती दातार यांच्या पुस्तकाचे आठ मार्चला प्रकाशन पुणे : माणसाचा चेहरा प्रसन्न असला, की समोरच्यावर प्रभाव पाडण्याचे अर्धे-अधिक काम होऊन जाते. ही प्रसन्नता मनावर अवलंबून असते हे खरेच; पण बाह्य सौंदर्याचा विचार करायचा झाल्यास या प्रसन्नतेत सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावतात ते सुंदर दात. दात सुंदर आणि निरोगी राखण्यासाठी, तसेच संपूर्ण मौखिक आरोग्यच चांगले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language